Sunday, January 3, 2010

पुन्हा एकदा महराजांचा राज्याभिशेक घडला रायगडावर....

नमस्कार मंडळी,
तसा मी हार्डकोर शिवप्रेमी नव्हतो, पण 96 कोळी मराठा असल्यामुळे महराजांबदृृल आदर, अभिमान आणित्याच बरोबर हेवा मनामध्ये होता, पण शिवाजी महराजांच्या किर्तीला जवळून पाहण्याचा योग गेल्या शनिवारीम्हणेजच दि. 16 जानेवारी 2010 मध्ये घडला, नशिब आणि वेळीची साथ याचा सुरेख मिलाफ या छोटयासहलीतुन दिसला....
शुक्रवार रात्री सहज मनात कल्पना आली की शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवषी आॅफीसला सुटृटी आहे, तरमग कोठे तरी जाउयात, मग कोठे ? तररायगडहे नाव अचानक लक्षात आले। मग कोणीतरी सोबत हवं म्हणूनसर्व मित्रांना फोन लावला आणि मग सहलीला येणार का? हा प्रश्न विचारला, दरवेळी जशी अपेक्षीत उत्तर असतात, तशी उत्तर मिळाली. ‘साॅरी अरे, गर्लफेंड सोबत बाहेर जायचा आहे’ ‘अरे यार दुसराच प्लॅन आहे’, ‘अरे यार! पहिलेका नाही सांगीतला’, ‘नाही राव.... आराम कारायचा आहे’, कोणीही एक शब्दातहो चल जाउयातअसे म्हटल नाहीपण या सर्व उत्तरां पलीकडे एक उत्तर अनपेक्षीतपणे उभे राहीले ते म्हणजेच्यामारी!!!, चल दंगा घालुयातहे उत्तरविहारचं, विहार हा एक कोल्हापुरचा मिनी पहिलवानच तो एक कोल्हापूरी थाटात हो म्हणत आमचा शनिवारसकाळी 730 ला जायचा प्लॅन फीक्स झाला कुठल्याही प्रकरचा प्रिप्लॅन नसल्यामुळे फक्त जाण्याचा उत्साहहोता, दोघंाचीही पहिलीच वेळ असल्यामुळे किती किलोमीटर ? रस्ता कसा? हे काहीच माहीती नव्हत. रात्री 10 वाजता फोनवर माझ शेवटच वाक्य होततु उठला की मला मिस्ड कॉल दे’.... झोपेचा प्रचंड चाहता मी, रोज झोपेचापूर्ण आनंद घेणारा मी, सकाळी 1130 च्या आॅफीसला झोपेमुळे 1145 ला पोहोंचनारा मी, सकाळी 630 वाजता उठण्याचा निर्धार करुन झोपलो... अती क्रिअेटिव्ह आणि काहीपण विचाराचे भारे बांधणारा मी, रात्रीझोपेतच रायगड कसा असावा याचे चित्र मनाच्या कॅनव्हाॅस वरती काढत मी रात्री गाढ झोपेत गेलो...
शनिवार दि. 16 जानेवारीची पहाट उजाडली, पण नवलाई म्हणजे मी पहिलांदाच सकाळी 6 ला उठलो आणि मीस्वतः विहारला मिस्ड कॉल दिला, आणि दोन्ही कडे जाण्याची तयारी सुरु झाली... 15 जानेवारीच्या सुर्यग्रहणामुळे, कमालीची थंडी होती, धुकतर काय विचारुच नकादाटशब्दसुघ्दा विराळ वाटेल अस धुक, थंडगार वारा वाहतहोता, सकाळी :३० वाजता मी ठरल्याप्रमाणे आॅफिसात पोहंचलो आणि विहारने माझ्याआदीच बाजी मारलीहोती, ऐवढया थंडीत अंगावरती फक्त टिशर्ट आणि थ्री-फोर्थ मध्ये असा तो माझ्या समोर उभा राहिला. माझ्यागाडीला ब्रेक कमी, आणि सव्र्हिसींग केल्यामुळे माझी गाडी रिजेक्ट झाली, आणि विहारच्या गाडीवरती जायचाठरल. पुणे - मुंबई बायपास हायवे वरुन वाया मुळशी रायगडला जायचे होते, मुळशी पर्यंत मी टवाळक्या केल्याहोत्या पण त्या पुढे देवाच्या नावावरच रस्ता होता, असो मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली, आॅफिसातुननिघताच पुढच्या 100 फुटावरतीच आमचा पहिला स्टॉप... गरमा गरम वडापाव आणि गरम वाफा काढणारा चहा वाहहहहहह!!!, (चहाच्या वाफांसोबत स्पर्धा करत विहारने सुध्दा वाफाकाढणारी नळी ओढली) आता तिथे १० तब्बलमीनीटे आम्ही चहावाल्यासोबत टावळक्या केल्या, आणि आता, रायगडाच्या वाटे...
आता नाॅनस्टाॅपरायगडम्हणत विहाराने गाडीला किक मारली, थंड वारा - धुक जनु मिळुन कालवाच घालीतहोते, हायवे लागताच 80-90 च्या स्पीड मध्ये पुणे शहराला राम राम ठोकला...

थांबा थांबा...
दोन शिव्या घालण्या आदी, माझी कबुली ऐकावी... तसा मी खुप चांगला लिहीतो यातला काहीच प्रकार नाही, ही तर माझ्या पहिल्या ब्लॉगची पहिलीच पोस्ट आहे, कदाचीत तुम्हाला आवडणारही नाही, पण आयुष्यात पहिलांदाच काहीतरी चांगल करतोय
, अस मनातुन आवाज येतो, या आवाजाला फक्त तुमची साथ हवीय, पुढचीपोस्ट टाकु का? याच उत्तर तुमच्या कढुन हवंय (नाही म्हटला तरी अगाउपणा करणार हे नक्की) असो तुमच्या रिप्लाय / प्रतिक्रीयासाठी व्याकुळ (प्रतिक्रीया कुठल्याही भाषेतुन चालतील) कळावे.
पंकज
...

6 comments:

  1. aaaiiig... aycha... ho ho mich to ati utsahi prani kay sangu aho ajun pay dukhatayat but its ok yaar danga ghatla bass.. a pankya salya comment chi vat nako pahu dusra blog lihun tak be. tula thodphar bar lihta yetay ani swatbaddal vachayala mala bar vatatay challl lihi pahu...

    ReplyDelete
  2. Arrrre pudhe kay zala he kasa kalnar??????
    Viharne kiti danga ghatla he kon sangnar????
    Chal ata patkan lihun tak pudhchi kahani.....

    ReplyDelete
  3. barobar ahe..... pudhacha viharcha danga.... kon sanganar.... tasa sagaychi garaj nahi amhala mahiti ahe.... pan utsukata.... ahe...

    ReplyDelete
  4. पंकज राव ! लय भारी लिहिलं आहे. मस्त.

    आपलं नाव आणि ब्लॉग पाहून बख्खळ आनंद झाला !

    जगात जर्मनी आणि भारतात परभणी !

    माझा ब्लॉग - niranjan-vichar.blogspot.com

    - Niranjan.

    ReplyDelete
  5. टाका पुढची पोस्ट , आवडेल वाचायला !

    ReplyDelete
  6. mayla pankya writer honarki kay ? are chan lihitos yar keep it up !!!!

    ReplyDelete