Monday, January 18, 2010

थोड़ माझ्या बद्दल

मी पंकज तसा मुळ परभणीचा शिक्षण आणि करिअरसाठी पुण्यात आलो, कलेची आवड आणि काही तरी नवीनकरण्याची इच्छा असल्यामुळे मी ग्राफिक्स आणि वेबची वाट पकडली आणि सध्या तरी त्याच चालत आहे असो, आता मी हा ब्लॉग का लिहीतो आहे ? अगाउपणा, नसती उठाठेव आणि काहीतरी वेगळ करण्याची तिव्र इच्छा असल्यामुळे हा ब्लॉग लिहीण्यासाठी घेतला आहे, पण माझ्या मतेब्लॉगम्हणजे असा एक व्यासपीठ की ज्या वर तुम्ही आपल्या मनातील विचार लाकोंपर्यंत पोहोचवू शकता, ब्लॉग हा फार प्रसिध्द व्हावा असा हेतू ठेवता जर प्रत्येकाना स्वःतहाचा ब्लॉग लिहीलाच, तर आपल्या मानातील -या भावना मनातीली विचार तुम्हाला जगासमोर मांडता येतील. यात काहीच वाईट नाही, मला तरी वाटते की सर्वांनीच ब्लॉग लिहावा या मुळे मनातील विचाराला नवीन वळण येते, आणि माझं मत मी मांडल आहे याचा आनंद भेटतो. तसा मला फार काही लिहीता येत असकाहीच नाही, व्यकरणाचे तीन-तेरा, आणि शुध्दलेखनाचे तर तेरा-तीनशेच आहेत, पण काय माहीती या चुकामधुनच तुमच्या गालावर हसु आल तर, मला यात नक्कीच आंनद वाटेल. मी या ब्लॉगवर सतत काही तरी नवीनकरामती टाकत राहीण, आणि हो सांगयचा असा की या ब्लॉग मध्ये समाजकारण, मुल्य, प्रतिष्ठा, देश, आचार, विचार, आत्याचार, भ्रष्टाचार, अशा कुठल्याही विषयावरचे प्रयोग करणार नाही. मी फक्त लोकांना हसवण्यासाठी त्यातुनच काही मला आवडलेल्या चांगल्या किंवा वाईट गोष्टीची चर्चा करणार आहे. ही चर्चा थेट तुमच्या सोबतचआहे, आपण माझ्या प्रत्येक पोस्ट वर प्रतिक्रिया, म्हणजेच रिप्लाय द्यावा आशी आशा आहे, पण चांगलीच प्रतिक्रिया असावी आशी आशा मुळीच नाही, पण विषयला धरुन असेल तर उत्तम, असो श्री गणरायाचा नाव घेवुन मी नारळ फोडतो आहे (जरा बाजुला सरका, नारळ फोडतो) आणि आपल्या सर्वांच्या आर्शिवादने या ब्लॉगची सुरुवात करतो .

No comments:

Post a Comment