Wednesday, January 20, 2010

सहलीचा पुढचा भाग...

सर्वप्रथम तुमच्या कमेंट बद्दल मनातुन आभार आणि त्या थोर वाचकांना मानाचा मुजरा ज्यांनी मला सहन केलं (स्पेशल आभार: बेबीडाॅल वैदेही आणि सतत हसतमुख निताचे), असो
सहलीचा पुढचा भाग...पुणे शहराला राम राम ठोकल्यानंतर थोडयाच वेळात पुणं आता थुक्यात धुसर होत गेल... आणि आता हिरवी गार झाडी आणि डोंगररांगा दाट होत चालल्या होता, सकाळची वेळ असल्यामुळे सर्व झाडयांचा पानावर दव दिसत होता आणि ब-याचदा दुर्मिळ पक्षांचा दर्शन सुध्दा घडलं, तसेच एक छान मुलगी (पाखरु) सुध्दा आम्हाला ओव्हरटेक करुन पुढे गेली, एकंदर निसर्गाचा पूर्ण स्वाद मी मागे बाईकवर बसून घेत होतो, विहारला एक एक नविन गोष्ट मागेबसुनच नॅव्हीगेट करत होतो, आता छोटी छोटी खेडी लागत होती, विरळ माणसांची वस्ती तर कधी कधी शेताकडे जाण्याच्या घाईत जाणारा शेतकरी व त्याचा परिवार दिसत होता, मला उगाच मागे बसून मस्ती आली आणि मी वाटेल दिसेल त्याला हात दाखवत होतो, हात दाखवलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर एक नविनच भाव दिसत होता, कोणी भित भित हात दाखवत, तर कोणी सहज मनमोकळया पणाने हात दाखवत, पण या हात दाखवण्याच्या सर्व प्रकारात ‘आॅस्कर अवाॅर्ड’ मिळाला तो त्या ‘सु-सु’ करत असलेल्या 4 ते 5 वर्षाच्या मुलाला, मी हात दाखवल्या नंतर, त्याने विचार ही नाही केला तो कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याने लगलीच खुल्या मनाने हात वरती करुन आपल ‘काम’ चालुच ठेवलं, हा प्रसंग आज ही स्पष्ट आठवू शकतो असो, रस्ता आता आमचा जणू मित्रच झाला होता, आणि आता आम्ही मुळशी च्या ताम्हीणी घाटात पोंहचलो
ताम्हीणी घाट हा तसा पाहिलेला असल्यामुळे फार काही नवल नव्हतं, त्या घाटात 5-10 मी थांबून मग लागलीच आम्ही पुढच्या वाटे निघालो, रस्ता विचारत विचारत आम्ही आता बरेच दुर कोकणात आलो होतो, कोकणाची ती दाट हिरवी झाडी खरच मनाला भुरळ घालत होती, आता एकदाची आम्हाला ‘वॅलकम टू रायगड’ ही पाटी दिसली, पाटी दिसल्या नंतर दोघांनी ही सर्व प्रथम आकाशाकडे पाहिलं की रायगडाचा उंच डोंगर कोठे दिसतो का ? पण दुर दुर पर्यंत असा उंच डोंगर नव्हता मग अस लक्षत आल की, रायगड आता बरेच पुढ आहे, रस्ता तसा कचाच होता पण छान हिरवी झाडं दोन्ही बाजुंनी असल्यामुळे त्यात ही एक वेगळीच चाहुल होती, आणि दुपारी 1 च्या सुमारास आम्हाला रायगडाचे दुरुनच दर्शन झाले
भव्य डोंगर, हिरवी गार झाडी, आणि त्या वरती बुलंद रायगडाचे धुसर चित्र दिसले. पण सकाळपासुन काहीच खाल्ले नसल्यामुळे आधी पोटामधील शिवकालीन युध्द थांबविण्याची नितांत गरज होती, तिथेच गडाच्या पायथाशी गाडी पार्क करुन आम्ही काही तरी पोटात टाकण्यासाठी हाॅटेल पाहत होतो, पण गडाच्या पायथ्याही देशमुख अॅण्ड कंपनीेने पूर्ण वर्चस्व केले आहे, सर्व ठिकाणी देशमुखांच्याच हाॅटेलस् त्याच एका देशमुख हाॅटेलात आम्ही गेलो आणि जेवणाची आॅर्डर दिली, जेवण येई पर्यंत चेह-या वरती पाणी मारावं असा आम्ही विचार केला आणि पाण्याचा जग हाती घेवून, उघड जागेवर आलो, तितक्यात ‘आहो काय करता ?’, असा जोरात आवाज आला आणि पाणी !फक्त पिण्यासाठीच वापरा, वरती पाण्याची फार टंचाई आहे असं कळाल, आता फक्त हात धुवूनच आम्ही फ्रेश झालो, शेवटी जेवणचं ताट समोर आले आणि मग काय ‘आक्रमण’ म्हणण्याआधीच आम्ही सुरु झालो, पोटात दोन घास टाकल्या नंतर, आम्ही आता गड सर करायचा ठरवलं, शिवरायांच नाव घेत भव्य रायगडाच्या 1426 पाय-यांपैकी, पाहिली पायरी आम्ही चढलो,,,,,
रायगडाच्या पाय-यांच विशेष म्हणजे पहिली पायरी दुस-या पायरीशी कोठल्याही प्रकारचा साम्य ठेवणार नाही याचा पूर्ण पणे विचार केलेला दिसत होता. आकार, उंची, जाडी, आणि दिशा याचा कसा बदल प्रत्येक पायरीत होईल याचा शास्त्रशुध्द आभ्यास केलेला दिसतो, म्हणुन पहिल्या शंभर पायरी नंतरच आमचा तोल आता निसटू लागला, पण वरतून खाली ब-याच गोड मुलींचे चेहरे आमच्या समोर जात असल्यामुळे, आम्हाला तोल सांभाळावा लागला, 300 - 400 पायरीनंतर ताक विकणारी एक अतिवृध्द आजी तिथे होत्या आणि त्यांना ताक घेण्यासाठी आग्रह केला, मला त्या आजींचा आग्रह मोडवला नाही, आणि आम्ही दोन मोठी ग्लास ताक पिले.

No comments:

Post a Comment