Saturday, November 12, 2011

नवीन व्यवसायीकासाठी एक सोपा उपाय

सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, जयंवत नारळीकर, या यादीत मध्ये कुठली साम्यता आहे? ते आप-आपल्या क्षेत्रात दिग्गज आहेत. बरोबर आणखी काय सांगता येईल, हो ही सर्व दिग्गज लोक मराठी आहेत, मराठीच स्वाभिमान असण हे आजकाल खरच गरजेच आहे.
त्या सर्व मराठी माणूसास मानाचा मजूरा जो या अत्याधूनिक जगात मराठी ठसा उमटवण्याचा अतोनात प्रयत्न करतोय, आज मराठी व्यक्ती व्यापार. उदृयोग, व्यवसाय या क्षेत्रातही आपल नशीब अजमतोय आणि यशही सपंन्न करतोय, नवीन व्यवसाय उभ करण्यासाठी बरीच मेहनत करवी लगते, खर पाहिलतर व्यावसाय निवडी पासूनच कष्ट सूरु होतात, मग भांडवल, पैसा, मनूष्यबळ हे सर्व आलेच, कष्ट येथेच संपत नाहित नंतरही आपल्या व्यसायाची मार्केट मध्ये सुरुवातीलाच छाप पडणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे, मग त्या मध्ये टार्गेट ग्रुप पर्यंत सोशल मिडाया मधून छाप पाडणे हे सर्व देखील आलेच.
या सर्व प्रकाराचे वन स्टाॅप सलाॅशन आता आमच्या कडे wwww.pixelandcurve.com आहे,
नवीन व्यवसाय किट
कंपनीचा लोगो, लेटर हेड, व्हिजीटिंग कार्ड, वेबसाईट, फेसबूक फॅनपेज हे सर्व एकाच रुपात रंगात असल्यामूळे त्याला मार्केट मध्ये वाॅल्यू येते आणि आपल्या नवीन कंपनीची छाप पडते, आणि हे सर्व एकाच ठिकाणी मिळाल्या मूळे तूम्ही तूमच्या बाकी व्यवसायीक गोष्टीसाठी भरपूर वेळ देउ शकता,
अधिक माहितीसाठी संपर्क करा
www.pixelandcurve.com
Facebook fanpage
Call : 9970250233

Saturday, February 20, 2010

कलरफूल खिचडी...

करिअर करण्यासाठी म्हणून पूण्यात आलेला मी, पूण्यात गेली 5 वर्षापासून बॅचलर लाॅईफ जगतोय, हो.... हो.... हो.....बरोबर बॅचलर म्हटल कीमस्ती’, ‘आजादी’, ‘खुलेपण’, ‘अॅशहे सर्व ठिक आहे, पणज्याच जळत त्यालाचकळतत्यातला हा भाग आहे असो. तसा मी घरातला पहिलाच व्यक्ती, की ज्यांने गावाबाहेरझेंडागाडला, पणएकटयाने राहणे खरच किती अवघड असते, याचा प्रत्यय मला क्षणोक्षणी येतोय. घरातलंशेंडेफळअसल्यामुळेकिचनचेमहाभारतकाय असते? हे कधीच कळले नाही,
पण येथे पुण्यात माझ्या रुममेट ला थोडा संयपाक येत असल्यामुळे किचन सेटअप आहे, पण मला त्या स्वयंपाकामधला अर्धासुध्दा येत नाही, म्हणूनच मी त्या गॅस आणि भांडयांना वळसा घालूनच काम करत असत, पणज्या ज्या वेळी मी त्या गॅस आणि भांडयांकडे नजर चोरुन पाहत असत त्या त्या वेळी मला ती जोरजोरात हसुनचिडवत असल्याचाचभासमला हात असत, हा प्रकार मी गेली 2 वर्षापासून सहन करतच होतो, पण एकाविकएंडला माझा रुममेट मला एकटा त्या गॅस-भांडीच्या स्वाधीन करुन, गोवा ट्रिपला गेला, आता मी रुममध्येएकटाच आणि ती हसणारी गॅस आणि भांडी, पण आज मला त्यांच्या सोबतदोन हातकरायचीच होते, आताआपण काही तरी आंतकवादी कारवाई करतोय या नजरेत मी हळुच जागेचा आढावा घेतला आणि तांदूळखिचडीकरण्यासाठी लागणारी सामग्री असावी असा अंदाज बांधला. पण आता खिचडी कशी करायची? याचा काहीच अंदाजनसल्यामुळे, मी पहिले खिचडी करतात तरी कशी ? हे जाणून घेण्याचा शहानपणा केला. त्याच स्वयंपाकघरामधुनआमच्यामातोश्रीला फोन लावला... ‘हॅलो आई, आगं,,, मी आज एकटाच घरी आहे, आणि आजमीखिचडीकरणार, हे सांगितले’, हे ऐकल्यानंतर आईखुदकनहसली आणि तीचा आपल्या लाडक्या मुलाबददलच प्रेमसमोर आलं, ‘पंकु, कशाला करतोस रे, तु बाहेरुन काही तरी खण्यासाठी मागव,’ असा सल्ला दिला, पण आजमहाभारतच्या लढाईचा पहिलीच दिवस होता, आणि मला ही लढई जिंकणं फार गरजेच होतं, याची कल्पना आईलाफोनवर करुन दिली, आणि शेवटी मला तीने खिचडीच्या लढाई साठी होकार टाकीत आर्शिवादही दिला, आणिखिचडीसाठी काय काय लगेल याची लिस्ट आणि करण्याची पध्दत आईने एका दमात सांगून मोकळी झाली.
एकंदर मला आता विजयाचा गुरुमंत्रच मिळाला होता, आणि स्वयंपाकरुम मध्ये परिस्थिती बदलली होती, सर्वभांडी मला भित असल्याचे मला जाणवले, भांडांची आपअपसात लपवा लपवी चलतांनाचा मला भास झाला, पणमी कमीत कमी भांडी वापरायची असा निर्धार केला आणि डायरेक्ट कुकरमध्येच सर्व प्रपंच करायचा ठरवलं, थोडयाही क्षणाचा विलंब करता मी गॅसवर गारगोटीचा खेळ जसा लहानपणी करतात त्या प्रमाणे गॅस लायटरचा खेळ केला, 2 - 3 वेळा प्रयत्न केल्या नंतर शेवटी गॅसचा छोटा भडका झाला आणि लढाईला सुरुवातीची तोफेचीसालामी मिळाली, सर्व प्रथम सांगितल्या प्रमाणे थोडस् तेल टाकून ते थोड गरम होई दिलं. आणि मग, थोडे जिराआणि मोहरी घातली, ती तडतड झाल्यानंतर त्यात थोडी रेडिमेड जिंजर-र्गालीक पेस्ट घातली, मग आता तेल जराजास्तच गरम झाल्या नंतर मला हे कळला की मी तांदूळ धुवून घेतलच नाहि, मग गॅस बंद करुन तांदूळ धूवूनघेतले नंतर गॅस परत चालू केला आणि मग ते तांदूळ त्यात टाकले, पण नंतर अस लक्षात आल की खिचडी मध्येतांदूळाची बहिणदाळसुध्दा असते मग पुन्हा गॅस बंद केला आणि दाळीला आंघोळ घातली आणि परत गॅसपेटवला, सध्या त्यात पाणी घतल्याने त्या जिंजर र्गालीक पेस्ट आणि जीरांचा कलर काळाकुट झाला होता, फायनलि मी त्या कुकर मध्ये एकदाची दाळ घातली आणि पाणी ओतलं थोडास बरा सुगंध स्वायंपाक घरातआल्यानंतर मी छातीफागवून स्लाॅ मोशन मध्ये मान फिरवली.... मी कोणाली तरी खिचडी कशी करायची, याची बोलता शिकवण देतोय असा भाव चेह-यावर आणला, कुकरमधल्या सर्व पदार्थाला थोडस हलवून आता कुकरचझाकन लावूयत म्हणून ते पाहत होतो, झाकन मिळाल आणि आता झाकन लवतांना मी जिवाची पराकाष्टा सुरुकेली. जवळपास 5 मिनिंटे कुकरच झाकण मी नुसताच त्या वरुन गोल फिरवीत होतो, पण झाकन काही कुकरलाबसायला तयारच नव्हत, एक वेळ अशी आली की मी आता हरलो असापांढरा झेंडादाखवणार त्या क्षणीच देवालामाझी कीव आली आणि झाकण लागल.
आता आईने सांगितल्या प्रमाणे माझ्या खिचडी मध्ये आणि माझ्या मध्ये दोन शिट्टीच अंतर होतं, दोनमिनिटझाल्यानंतर माझ्या मनात कुतुल येण सहाजीकच होत की तांदूळाच होत तरी काय? या कुतुलहा पोटीच मीएक शिट्टी झाली कीच थोडा गॅस कमी करुन, कुकरच झाकन पूर्ण उघडणार नाही, याची कळजी घेत खिचडीचीपाहिणी केली पण अंदाज बांधता आला नाही. यात नेमक काय होतय, मग पुन्हा अलगत झाकन बंद करुन गॅसवाढवला आणि तुर्तास स्वयंपाकघराला रामराम ठोकला माझाा लॅपटाॅप आॅन केला, विंडो लोड झाल्यानंतरनेट कनेक्शन चालु करण्यासाठी डायलअपला डबल क्लिक केला, आणि इंटरनेट चालू, मग काय सारं विश्वचआपलं.... ‘जी टॅकआॅन केल्यानंतर मित्रांशी गप्पा मरत असतांनाच मि खिचडी ठेवली आहे हे लक्षात आलं आणिपळत जावून गॅस बंद केला आणि मग कुकर खली उतरविला, सर्व वाफ काढल्यानंतर डोळे मोठ मोठी करीत मीकुकर मध्येच शिरलो आणि अस लक्षत आल की आपणकलरफूलखिचड केली आहे, सर्व किचडी काढल्यानंतरपिवळी, नांरगी, चाॅकलेटी तर खलच्या ताळालाकाळीहोत जाणारी खिचडी सर्व एका ताटात घेवून मी आतालढाई जिंकल्याचा फरमान आईकडे फोनवरुन कळवला आणि आईनेपुढची दोन-तीन वर्षा आता लग्न नकोकरायलाअसा हुकुमही सोडला, असो
हो खिचडी खुप चांगली झाली होती. अहो खरच चांगलीच होती, हो मीठ विसरलो होतो हे तर खर आहेच, जिरेकरपल्यामुळे मध्येच जळालेली जव लागत होती, जिंजर र्गालीक पेस्ट पूर्ण जळाल्यामुळे ती कशी लगत होतीयाचा वर्णन मला करताच येणार नाही, हे सर्व जरी खर असलं तरी खिचडी एकंदर छानच होती,
काय ? काय ? तुम्हाला आवडली काय बोलता ? या की मग घरीवेलकम

Saturday, February 13, 2010

पुण्यामध्ये एका बेकरीत बोम्बस्पोट 5 मृत्यू तर 21 जण जखमी

टाईम्स आॅफ इंडियाच्या ताच्या बातमी नुसार दि 13 जानेवारी 2010 रोजी 7 च्या सुमारास हा शक्तीशाली बाॅम्बस्पोट झाला, कोरगाव पार्क येथील एका प्रसिध्द बेकरी मध्ये हा स्पोट घडला, अंतकावादीविरोधी दल आता पुढीची शहानीशा करत आहे,

http://timesofindia.indiatimes.com/city/pune/New-Article/articleshow/5569873.cms

Tuesday, February 9, 2010

एकदा आठवूण तर पाहा

टीव्ही कमर्शियल हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे, नाही का? हल्ली अती टीव्ही कमर्शियलमुळे तुम्ही हैराण होउन, चॅनल बदलता, पण तरीही जाहिरात किंवा कमर्शियल ‘स्किप’ करु शकत नाही, हे तुम्ही अनुभवलं असेलच, पण एक तो काळ होता की त्यात आपण टिव्ही कमर्शियल एंजाॅय करत असत, तुम्हाला आठवत का ??? मला तरी लहानपणी कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच फार आवडत होत्या, आम्ही तर मित्रकंपनीत ‘तुला कुठली जाहिरात आवडते?’ हा सर्रास प्रश्न विचारत, त्यात प्रत्येकाची चाॅइस वेगळी असयची त्या पैकी आठवणीत राहणा-या काही या ‘खास’ जाहिरातीची आठवण तुमच्यासाठी...
‘धारा’ ब्रॅंडची घरातुन पळुन चालेलेल्या त्या गोड मुलाच्या थिमवर ’जलेबीची‘ अॅड...
तर मोठ मोठया पु-याच्या भोवती खेळणारा तो मुलगा...
दम लग कर हैशाऽऽऽ, जोर लगा के हैशाऽऽऽ त्या हत्तीची - फेविकाॅलची अॅड...
बुलंद भारत की बुलंद तसवीर - हामरा बाजाज...
कॅडबरीज चाॅकलेटच्या क्रिकेड थिम मधील ‘कुछ खास है जिंदगी मे’ अॅड...
लग्नाच्या वेळी वडीलांकडून मुलीस गिट म्हणून ती टायटन ची घडळ थिम,आणि बॅकग्राउंडला वाजणारी ती सुरेख टायटनची म्युझिक (हि म्युझिक मी आजही रोज ऐकतो)
मीले सुर मेरा तुम्हारा - (दुरदर्शन)
स्र्पेड द लाईट आॅफ फ्रिडम - (मशाल घेउन पळणारे सर्व क्षे़त्रातील खेळपटू)
पियो ग्लास फुल दुध - काॅ-आॅपरेटिव्ह
मिल्कजब जिंदगी लगे भारी - पर्क ची प्रिटी झिंटाची अॅड
आणि आशा ब-याचश्या अॅड फक्त एकदा आठवूण तर पाहा,
मज्जा येईलआणि जर तुम्हाला कुठल्या आठवत असतील तर जरुर कमेंट करुन पाठवा

फक्त एकदा आठवूण तर पाहा...

टीव्ही कमर्शियल हे जीवनाचा अविभाज्य घटक आहे, नाही का?
हल्ली अती टीव्ही कमर्शियलमुळे तुम्ही हैराण होउन, चॅनल बदलता, पण तरीही जाहिरात किंवा कमर्शियल ‘स्किप’ करु शकत नाही, हे तुम्ही अनुभवलं असेलच, पण एक तो काळ होता की त्यात आपण टिव्ही कमर्शियल एंजाॅय करत असत, तुम्हाला आठवत का ??? मला तरी लहानपणी कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच फार आवडत होत्या, आम्ही तर मित्रकंपनीत ‘तुला कुठली जाहिरात आवडते?’ हा सर्रास प्रश्न विचारत, त्यात प्रत्येकाची चाॅइस वेगळी असयची त्या पैकी आठवणीत राहणा-या काही या ‘खास’ जाहिरातीची आठवण तुमच्यासाठी...
‘धारा’ ब्रॅंडची घरातुन पळुन चालेलेल्या त्या गोड मुलाच्या थिमवर ’जलेबीची‘ अॅड...
http://www.youtube.com/watch?v=PbV5Y5KJCUs&feature=related
तर मोठ मोठया पु-याच्या भोवती खेळणारा तो मुलगा...
दम लग कर हैशाऽऽऽ, जोर लगा के हैशाऽऽऽ त्या हत्तीची - फेविकाॅलची अॅड..।
बुलंद भारत की बुलंद तसवीर - हामरा बाजाज...
http://www.youtube.com/watch?v=xEV8MWd1p3M&feature=related
कॅडबरीज चाॅकलेटच्या क्रिकेड थिम मधील ‘कुछ खास है जिंदगी मे’ अॅड...
http://www.youtube.com/watch?v=485lz0ZEwEw&feature=related
लग्नाच्या वेळी वडीलांकडून मुलीस गिट म्हणून ती टायटन ची घडळ थिम,आणि बॅकग्राउंडला वाजणारी ती सुरेख टायटनची म्युझिक (हि म्युझिक मी आजही रोज ऐकतो)
http://www.youtube.com/watch?v=QikEwUA-6Gk
मीले सुर मेरा तुम्हारा - (दुरदर्शन)
http://www.youtube.com/watch?v=gstRrEmTcBc
स्र्पेड द लाईट आॅफ फ्रिडम - (मशाल घेउन पळणारे सर्व क्षे़त्रातील खेळपटू)
पियो ग्लास फुल दुध - काॅ-आॅपरेटिव्ह मिल्क
http://www.youtube.com/watch?v=ZjFH6yZ8LIA&feature=related
जब जिंदगी लगे भारी - पर्क ची प्रिटी झिंटाची अॅड

आणि आशा ब-याचश्या अॅड फक्त एकदा आठवूण तर पाहा, मज्जा येईलआणि जर तुम्हाला कुठल्या आठवत असतील तर जरुर कमेंट करुन पाठवा

Thursday, January 28, 2010

नटरंग फडामंदी ‘पांडुमा’ बेस गावला...

मराठी चित्रपट म्हटलं की माझ्या कपाळवरती आठया पडत होत्या, मराठी चित्रपटात कोठलाही संदेश लोकसमुदायस जात नव्हता, एकदम गावराण भाषा मराठी चित्रपटात का वापरतात हे न समजलेल कोडच आहे. महाराष्ट्राच्या कोठल्याही गावात एवढी गावराण भाष आता वापरली जात नाही, हे मी पैज लाउन सांगतो. तसा मी सुध्दा खेडे गावातुन असल्यामुळे याची मला पुर्ण खात्री आहे, तस पहिल तर आता प्रत्येक गावात निरक्षर लोक सुध्दा ‘पीलईज’ आणि ‘ठयाक्यु’ चा योग्य ठिकाणी उपयोग करु लागली आहेत असो, मराठी चित्रपाटीतील ती जाड नटी आणि गाण्यांसाठी वापरली जाणारी ती बाग-बगिचे आणि सर्रस दाखविली जाणारी ती कर्रदळीची फुलं माझा श्वासच रोकत होती, अठवत आहे ना तुम्हाला ? व कोठेही न हसु येणारी कॅमेडी दाबुन काचाकच भरलेली असते, आणि हो त्या बिनबुडाच्या कथेला आता मराठीने कायमचा रामराम ठोकलेला दिसतो आहे.
पण आता ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि ‘नटरंग’ सारख्या चित्रपटांनी दर्जादर कमीगीर करत मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आणले आहेत, काल नटरंग पाहिला आणि खरच दर्जादार कालकार या ‘फडात’ होती, मला अतुल कुलकर्णीची मेहनत पाहुन गर्वाने म्हणाव अस वाटत की, टाॅम हाॅक्स हाच फक्त कास्ट अवे साठी आपल्या शरीरासोबत दोरीवरची कसर करत नाही तर आमचा मराठी कलाकर ही त्याच बरोबरीचा आहे. असो नटचा काम उत्तम होतच पण त्याच बरोबर, मला सहकलाकरांच कामही फार अवडल, त्यात फडाचा सोंगाडयाची तालीम तर राजकारणी थाटत मिरवणारे माने साहेब पण तीतकेच ‘काम’ दाखुन गेले.


या सर्वात पट्टीचा कलाकार वाटला तो म्हणजे ‘पांडुमा’, पांडुमाची डायलाॅग डिलेवरी अतीशीय सुरुेख होती, आम्ही सर्व मित्र मराठी कलाकार चांगल काम करत असल की, हा ‘थिएटर अॅक्टर’ आहे बहुतेक म्हणुन त्याला ख-या कलाकराची पावती देतो, त्याचा डायलाॅग मध्ये साधीच भाषा पण डायलाॅग म्हणण्याची स्टाइल ही एकदम ख-या गावाकडच्या मुरलेल्या ‘निंबरी’ माणसाची होती, सिनेमात असे कुठेही वाटत नाही की तो दिलेले डायलाॅग तुमच्या समोर मांडतो आहे, त्याचे प्रत्येक शब्द हे सहज आणि चालत्या परिस्थितीची एकरुप होती, मला तर त्यांच्या डायलाॅग मध्ये पूर्ण अभ्यास आणि मेहनत दिसते. कदाचित या कामसाठी त्यांनी खूप परिश्रम हि घेतला असेल , पण खंत येची आहे की या कलाकाराच नाव मला सध्यातरी माहिती नाही, कृपया अपल्याला माहिती असेल तर जरुर कळवावं, बाकी तुम्ही नटरंग पाहिला असेलच हि अपेक्षा करतो.

Wednesday, January 20, 2010

सहलीचा पुढचा भाग...

सर्वप्रथम तुमच्या कमेंट बद्दल मनातुन आभार आणि त्या थोर वाचकांना मानाचा मुजरा ज्यांनी मला सहन केलं (स्पेशल आभार: बेबीडाॅल वैदेही आणि सतत हसतमुख निताचे), असो
सहलीचा पुढचा भाग...पुणे शहराला राम राम ठोकल्यानंतर थोडयाच वेळात पुणं आता थुक्यात धुसर होत गेल... आणि आता हिरवी गार झाडी आणि डोंगररांगा दाट होत चालल्या होता, सकाळची वेळ असल्यामुळे सर्व झाडयांचा पानावर दव दिसत होता आणि ब-याचदा दुर्मिळ पक्षांचा दर्शन सुध्दा घडलं, तसेच एक छान मुलगी (पाखरु) सुध्दा आम्हाला ओव्हरटेक करुन पुढे गेली, एकंदर निसर्गाचा पूर्ण स्वाद मी मागे बाईकवर बसून घेत होतो, विहारला एक एक नविन गोष्ट मागेबसुनच नॅव्हीगेट करत होतो, आता छोटी छोटी खेडी लागत होती, विरळ माणसांची वस्ती तर कधी कधी शेताकडे जाण्याच्या घाईत जाणारा शेतकरी व त्याचा परिवार दिसत होता, मला उगाच मागे बसून मस्ती आली आणि मी वाटेल दिसेल त्याला हात दाखवत होतो, हात दाखवलेल्या प्रत्येकाच्या चेह-यावर एक नविनच भाव दिसत होता, कोणी भित भित हात दाखवत, तर कोणी सहज मनमोकळया पणाने हात दाखवत, पण या हात दाखवण्याच्या सर्व प्रकारात ‘आॅस्कर अवाॅर्ड’ मिळाला तो त्या ‘सु-सु’ करत असलेल्या 4 ते 5 वर्षाच्या मुलाला, मी हात दाखवल्या नंतर, त्याने विचार ही नाही केला तो कुठल्या स्थितीमध्ये आहे आणि त्याने लगलीच खुल्या मनाने हात वरती करुन आपल ‘काम’ चालुच ठेवलं, हा प्रसंग आज ही स्पष्ट आठवू शकतो असो, रस्ता आता आमचा जणू मित्रच झाला होता, आणि आता आम्ही मुळशी च्या ताम्हीणी घाटात पोंहचलो
ताम्हीणी घाट हा तसा पाहिलेला असल्यामुळे फार काही नवल नव्हतं, त्या घाटात 5-10 मी थांबून मग लागलीच आम्ही पुढच्या वाटे निघालो, रस्ता विचारत विचारत आम्ही आता बरेच दुर कोकणात आलो होतो, कोकणाची ती दाट हिरवी झाडी खरच मनाला भुरळ घालत होती, आता एकदाची आम्हाला ‘वॅलकम टू रायगड’ ही पाटी दिसली, पाटी दिसल्या नंतर दोघांनी ही सर्व प्रथम आकाशाकडे पाहिलं की रायगडाचा उंच डोंगर कोठे दिसतो का ? पण दुर दुर पर्यंत असा उंच डोंगर नव्हता मग अस लक्षत आल की, रायगड आता बरेच पुढ आहे, रस्ता तसा कचाच होता पण छान हिरवी झाडं दोन्ही बाजुंनी असल्यामुळे त्यात ही एक वेगळीच चाहुल होती, आणि दुपारी 1 च्या सुमारास आम्हाला रायगडाचे दुरुनच दर्शन झाले
भव्य डोंगर, हिरवी गार झाडी, आणि त्या वरती बुलंद रायगडाचे धुसर चित्र दिसले. पण सकाळपासुन काहीच खाल्ले नसल्यामुळे आधी पोटामधील शिवकालीन युध्द थांबविण्याची नितांत गरज होती, तिथेच गडाच्या पायथाशी गाडी पार्क करुन आम्ही काही तरी पोटात टाकण्यासाठी हाॅटेल पाहत होतो, पण गडाच्या पायथ्याही देशमुख अॅण्ड कंपनीेने पूर्ण वर्चस्व केले आहे, सर्व ठिकाणी देशमुखांच्याच हाॅटेलस् त्याच एका देशमुख हाॅटेलात आम्ही गेलो आणि जेवणाची आॅर्डर दिली, जेवण येई पर्यंत चेह-या वरती पाणी मारावं असा आम्ही विचार केला आणि पाण्याचा जग हाती घेवून, उघड जागेवर आलो, तितक्यात ‘आहो काय करता ?’, असा जोरात आवाज आला आणि पाणी !फक्त पिण्यासाठीच वापरा, वरती पाण्याची फार टंचाई आहे असं कळाल, आता फक्त हात धुवूनच आम्ही फ्रेश झालो, शेवटी जेवणचं ताट समोर आले आणि मग काय ‘आक्रमण’ म्हणण्याआधीच आम्ही सुरु झालो, पोटात दोन घास टाकल्या नंतर, आम्ही आता गड सर करायचा ठरवलं, शिवरायांच नाव घेत भव्य रायगडाच्या 1426 पाय-यांपैकी, पाहिली पायरी आम्ही चढलो,,,,,
रायगडाच्या पाय-यांच विशेष म्हणजे पहिली पायरी दुस-या पायरीशी कोठल्याही प्रकारचा साम्य ठेवणार नाही याचा पूर्ण पणे विचार केलेला दिसत होता. आकार, उंची, जाडी, आणि दिशा याचा कसा बदल प्रत्येक पायरीत होईल याचा शास्त्रशुध्द आभ्यास केलेला दिसतो, म्हणुन पहिल्या शंभर पायरी नंतरच आमचा तोल आता निसटू लागला, पण वरतून खाली ब-याच गोड मुलींचे चेहरे आमच्या समोर जात असल्यामुळे, आम्हाला तोल सांभाळावा लागला, 300 - 400 पायरीनंतर ताक विकणारी एक अतिवृध्द आजी तिथे होत्या आणि त्यांना ताक घेण्यासाठी आग्रह केला, मला त्या आजींचा आग्रह मोडवला नाही, आणि आम्ही दोन मोठी ग्लास ताक पिले.