Thursday, January 28, 2010

नटरंग फडामंदी ‘पांडुमा’ बेस गावला...

मराठी चित्रपट म्हटलं की माझ्या कपाळवरती आठया पडत होत्या, मराठी चित्रपटात कोठलाही संदेश लोकसमुदायस जात नव्हता, एकदम गावराण भाषा मराठी चित्रपटात का वापरतात हे न समजलेल कोडच आहे. महाराष्ट्राच्या कोठल्याही गावात एवढी गावराण भाष आता वापरली जात नाही, हे मी पैज लाउन सांगतो. तसा मी सुध्दा खेडे गावातुन असल्यामुळे याची मला पुर्ण खात्री आहे, तस पहिल तर आता प्रत्येक गावात निरक्षर लोक सुध्दा ‘पीलईज’ आणि ‘ठयाक्यु’ चा योग्य ठिकाणी उपयोग करु लागली आहेत असो, मराठी चित्रपाटीतील ती जाड नटी आणि गाण्यांसाठी वापरली जाणारी ती बाग-बगिचे आणि सर्रस दाखविली जाणारी ती कर्रदळीची फुलं माझा श्वासच रोकत होती, अठवत आहे ना तुम्हाला ? व कोठेही न हसु येणारी कॅमेडी दाबुन काचाकच भरलेली असते, आणि हो त्या बिनबुडाच्या कथेला आता मराठीने कायमचा रामराम ठोकलेला दिसतो आहे.
पण आता ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ आणि ‘नटरंग’ सारख्या चित्रपटांनी दर्जादर कमीगीर करत मराठी चित्रपटाला सुगीचे दिवस आणले आहेत, काल नटरंग पाहिला आणि खरच दर्जादार कालकार या ‘फडात’ होती, मला अतुल कुलकर्णीची मेहनत पाहुन गर्वाने म्हणाव अस वाटत की, टाॅम हाॅक्स हाच फक्त कास्ट अवे साठी आपल्या शरीरासोबत दोरीवरची कसर करत नाही तर आमचा मराठी कलाकर ही त्याच बरोबरीचा आहे. असो नटचा काम उत्तम होतच पण त्याच बरोबर, मला सहकलाकरांच कामही फार अवडल, त्यात फडाचा सोंगाडयाची तालीम तर राजकारणी थाटत मिरवणारे माने साहेब पण तीतकेच ‘काम’ दाखुन गेले.


या सर्वात पट्टीचा कलाकार वाटला तो म्हणजे ‘पांडुमा’, पांडुमाची डायलाॅग डिलेवरी अतीशीय सुरुेख होती, आम्ही सर्व मित्र मराठी कलाकार चांगल काम करत असल की, हा ‘थिएटर अॅक्टर’ आहे बहुतेक म्हणुन त्याला ख-या कलाकराची पावती देतो, त्याचा डायलाॅग मध्ये साधीच भाषा पण डायलाॅग म्हणण्याची स्टाइल ही एकदम ख-या गावाकडच्या मुरलेल्या ‘निंबरी’ माणसाची होती, सिनेमात असे कुठेही वाटत नाही की तो दिलेले डायलाॅग तुमच्या समोर मांडतो आहे, त्याचे प्रत्येक शब्द हे सहज आणि चालत्या परिस्थितीची एकरुप होती, मला तर त्यांच्या डायलाॅग मध्ये पूर्ण अभ्यास आणि मेहनत दिसते. कदाचित या कामसाठी त्यांनी खूप परिश्रम हि घेतला असेल , पण खंत येची आहे की या कलाकाराच नाव मला सध्यातरी माहिती नाही, कृपया अपल्याला माहिती असेल तर जरुर कळवावं, बाकी तुम्ही नटरंग पाहिला असेलच हि अपेक्षा करतो.

7 comments:

  1. नटरंग पाहिला आणि आवडला सुद्धा! पांडुमा बेश्टचे! संवाद तर छानच म्हटलेत त्यांनी पण त्यांचा विशेष लक्षात रहाणारा अभिनय म्हणजे गुणाचं सांत्वन करतानाचा प्रसंग, लई झ्याक केलाय त्यांनी.

    ReplyDelete
  2. लई भारी पंक्या . . अजून विश्वासच बसत नाही कि तुला मराठी चित्रपट आवडला . . मी तुला म्हणालो होतो ना कि मराठी माणसात पण दम आहे आपल्या . . keep it up

    ReplyDelete
  3. त्या नटाचे नाव आहे किशोर कदम. हा एक उत्तम कवी पण आहे, टोपणनावाने कविता / चित्रपट गाणी लिहितो, पण टोपण नाव विसरलो.

    ReplyDelete
  4. @निरंजन, त्याचं टोपणनाव (कवितांसाठी) "सौमित्र" असं आहे.

    ReplyDelete
  5. त्यांचं टोपण नाव ’सौमित्र’ आहे.

    ReplyDelete
  6. अजूनही महाराष्ट्रातल्या बर्‍याच ग्रामीण भागांमध्ये अशी भाषा वापरली जाते. खान्देशमध्ये जाऊन पाहा...आपल्या ब्लॉगच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
  7. किशोर कदम यांनी नटरंग मध्ये आणि जोगवा मध्ये पण खूप मस्त काम केलाय . जोगवा मध्ये तर जास्तच भारी काम केलाय.

    ReplyDelete